मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेतील मुद्दे

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेतील मुद्दे   मुंबईकरांचे धन्यवाद व्‍यक्‍त करतो मतदानाला अतिशय उत्स्फूर्तपणे सकारात्मक प्रतिसाद मिळाला राजकीय विश्लेषक  जे सांगतात, मांडतात,  त्‍याप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढते ती परिवर्तनासाठी आणि बदलासाठी असते असेच निष्कर्ष असतात.     मुंबई महापालिका निवडणुकीत  यापुर्वीचे मतदान हे ४४-४५%  झालं होत.     यावेळी ५४% पर्यंत मतदान पोहोचण्याची शक्यता आहे अंतिम आकडा अद्याप येणे बाकी आहे. गेल्यावेळेपेक्षा वाढीव १०% मतदान झाल्याची शक्यता आहे या परिवर्तनासाठी मुंबईकरांचे धन्यवाद 2014 साली विधानसभेत ५४% मतदान झालं तेव्हा भाजपला १५ जागा मुंबईत मिळाल्‍या होत्‍या   विधानसभेला १५ जागा ि‍मळाल्‍या  आताचा निर्णय काय असेल, तुम्ही सुज्ञ आहात… भाजपने म्हटल होतं आमचं बलस्थान जमिनीवरचा कार्यकर्ता आहे.     मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी ते करून दाखवलं, नियोजन पद्धतीने उंच टॉवर, इमारती, बिल्डिंग, चाळी यातून मतदारांना बाहेर काढलं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन वोटिंग लिस्ट मध्ये चुका, वोटिंग केंद्र बदलली, वोटिंग लिस्ट उशिरा मतदारांची गळलेली नाव तरीही मतदान वाढणं हे परिवर्तनासाठी मतदान आहे, जनतेने स्पष्ट केलं विजयाचा दावा तसाच आहे….. तोच...

Read More

उत्तर मुंबईत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा प्रचाराचा झंझावात

उत्तर मुंबईत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा प्रचाराचा झंझावात

उत्तर मुंबईत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा प्रचाराचा झंझावात   मुंबई दि. १६ फेब्रुवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार  यांनी आज आपल्या प्रचार यात्रेचा समारोप उत्तर मुंबईत केला. उत्तर मुंबईच्या निम्म्याहून अधिक भागात त्यांनी आज सुमारे साडे तीन तास प्रचाराचा झंझावाती दौरा केला. उत्तर मुंबईतील कांदिवली, दहीसर, बोरीवली, मालाड, ठाकूर व्हीलेज, देवीपाडा, दत्तानी पार्क या संपूर्ण भागात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार  यांनी प्रचार यात्रा केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रविण दरेकर आणि भाजपा चे पदाधिकारी, उमेदवार उपस्थीत होते. सकाळी ११.०० च्या सुमारास  मालाड येथून या प्रचार यात्रेला सुरूवात झाली. पुढे कांदिवली, बोरीवली, दहीसर असे करत मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत ती  हा प्रचार रथ फिरला. ५०० हून अधिक बाईक, जागोजागी केलेले स्थानिकांनी स्वागत आणि स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात प्रचार रथासोबत पदयात्रा ही केल्यामुळे उत्तर मुंबईचा हा संपूर्ण परिसर आज भाजपाच्या घोषणांनी दुमदुमुन गेला होता. पारदर्शी कारभाराला आणि विकासाला मत द्या असे आवाहन करत भाजपा च्या झेंडा असलेल्या बाईक त्यासोबत तरूणाईचा उत्साह असा माहोल पाहायला मिळत होता. नागरिकांनीही उत्स्फूर्त पणे यात्रेचे स्वागत केले. दि. ११ फेब्रुवारी रोजी ही प्रचार यात्रा सुरू झाली, सुरूवातीला वांद्रे विधानसभा, पार्ले, कुर्ला, घाटकोपर,  विक्रोळी, मुलूंड, दादर, वडाळा, सायन, सायन कोळीवाडा, अणुशक्ती नगर जेट्टी, चेंबूर, घाटला व्हीलेज, देवनार, लालबाग, भायखाळा, नागपाडा, सि.पी.टँक, गिरगाव, फोर्ट, कुलाबा कोळीवाडा, दक्षिण – उत्तर , पूर्व – पश्चीम असा मुंबईचा कानाकोपरा पिंजून काढला.  या यात्रेचे नियोजन समन्वय मुंबई भाजपा चे सचिव कमलाकर दळवी  यांनी...

Read More

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांचा लालबाग – परळ मध्ये प्रचाराचा धमाका

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार  यांचा  लालबाग – परळ मध्ये  प्रचाराचा धमाका

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार  यांचा लालबाग – परळ मध्ये  प्रचाराचा धमाका   मुंबई दि. १५ फेब्रुवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार  यांनी आज शिवडी, परळ या भागात प्रचार यात्रा करून झंझावाती दौरा केला. आणि लालबाग परळ, शिवडी या मराठी बालेकिल्ल्यातील गल्लीबोळ पिंजून काढला.  तरूणाईचा उत्साह आणि स्थानिकांनी केलेले स्वागत यामुळे या संपूर्ण परिसरात भाजप ने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र  पाहायला मिळाले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार  यांनी मुंबईत प्रचार यात्रा कढून प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. घाटकोपर, विक्रोळी, वांद्रे, विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली खार या भागात प्रचार केल्यानंतर आज मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग, परळ, शिवडी या भागात झंझावाती प्रचार केला. ५०० हून अधिक बाईक, तरूणाईचा उत्साह आणि चौका चौकात होणार स्वागत यामुळे हा संपूर्ण परिसर आज सकाळी भाजपमय होऊन गेला होता. सकाळी  अकरा च्या सुमारास भारतमाता सिनेमा समोरून या प्रचारयात्रेला सुरूवात झाली. पुढे लालबाग गणेशगल्ली कडून केईएम हॉस्पीटल, शिवडी, काळाचौकी, जिजामाता नगर, अभ्यूदय नगर या संपूर्ण परिसरात प्रचार करण्यात आला. यावेळी भाजपा उमेदवार अरूण दळवी, माजी नगरसेवक नाना आंबोले त्यांच्या उमेदवार पत्नी तेजस्वीनी नाना आंबोले, राजन घाग आदींचा सहभाग...

Read More

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांच्या ‘रोड शो’ ला सुरूवात

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांच्या ‘रोड शो’ ला सुरूवात

मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांच्या ‘रोड शो’ ला सुरूवात कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतीसाद, जागो जागी केले नागरीकांनी स्वागत   मुंबई, दि. ११ मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांनी आजपासून रोड शो करीत मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला  सुरूवात केली.  त्याला कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतीसाद मिळाला. तर जागो जागी नागरीकांनी स्वागत केले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सभांचे झंझावात सुरू केले असून केंद्रीय मंत्रीही आता प्रचारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यासोबतच आता मुंबई भाजपा अध्यक्ष  आशिष शेलार  यांनी प्रचारयात्रेला सुरूवात केली आहे. आजपासून दि. १६ फेब्रूवारी पर्यंत सकाळी १०.०० ते १.०० आणि सायंकाळी ४.०० ते ६.०० अशा दोन सत्रात ही यात्रा होणार आहे.   आज सकाळी १० वा. पासून ते  दु. १ या वेळेत या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.  प्रचार रथ आणि  दुचाकी वाहनचालक कार्यकर्त्यांच्या ताफ्यात  या रोड शो चा पहिला प्रचाराचा कार्यक्रम पार पडला. एस.व्ही.रोड पोदार सिग्नल सांताक्रूझ (प), टीळक रोड, फिरोजशहा मेहता रोड, खोतवाडी, टी.पी.एस. रोड नं.१, मिलन सबवे, मिलन सिग्नल, सानेगुरुजी मार्ग, लिंकिंग रोड एक्स्टेंशन, जुहूतारा रोड, सखारामबुवा पाटील रोड, १९ वा रस्ता, सी.डी. मार्ग, आंबेडकर रोड, १७ वा रस्ता, सी.डी. रोड,  मधु पार्क,एस.व्ही.रोड, साधू वासवानी मार्ग, टर्नर रोड, बांद्रा स्टेशन, माघवराव सावंत रोड, हिल रोड, शिव सेना शाखा, जैन मंदिर रोड, बाजार रोड, सेंट पीटर रोड उजवी कडे, हिल रोड, बालाजी हॉटेल, मेहबूब स्टुडीओ, रिबेलो रोड, सेंट जॉन बाप्टीस्टा रोड, सेंट सॅबीस्टीयन रोड, सुपारी टँक, लीलावती हॉस्पिटल, के.सी.रोड, अलियावर जंग, उजवी कडे,नर्गिस दत्त नगर (एल.के. मेहता रोड, के.सी रोड, रिक्लेमेशन नित्यानंद नगर, ओ.एनजी.सी. कॉलनी, फ्लाय ओव्हर माहीम कॉजवे सिग्नल, वांद्रे इस्ट पर्यंत  असा मार्ग साधत आणि त्या त्या प्रभागातील भाजप उमेदवारांचा प्रचार करत मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईकरांना भाजपाच्या पारदर्शक विकासाच्या कारभारात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यासाठी भाजप च्या उमेदवाराला मतदान द्या  आणि मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने होण्यास प्रोत्साहन द्या! असेही त्यांनी सांगीतले.   दरम्यान रोड शो प्रचारात मुंबई भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मोहीत कंभोज, महापौर अलका केरकर, प्रभाग निहाय भाजप उमेदवार , भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत...

Read More

७०,००० कोटींचा हिशेब द्या! – अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

७०,००० कोटींचा हिशेब द्या! मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप पारदर्शीच्या मुद्द्यावर पाठ थोपटून घेणे म्हणजे “मंत्रापेक्षा थुंकी जास्त” मुंबई महापालिका जगात ५० व्या क्रमांकावर गेली हेही अहवाल सांगतो आहे, त्याचेही उत्तर द्या    मुंबई, दि. २ फेब्रूवारी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील २००७ ते २०१२ या वर्षातील सुमारे सत्तर हजार कोटींचा ताळेबंद नाही, हिशेब नाही याचे उत्तर आधी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेतृत्वाने द्यावे असा घणाघाती आरोप करत पारदर्शी च्या मुद्यावर चुकीचे संदर्भ वापरून  स्वतःचीच पाठ खाजवणाऱ्यांचा हा प्रकार म्हणजे मंत्रापेक्षा थुंकी जास्त आहे असा जोरदार प्रतीहल्ला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी चढवला.   केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालाचा चुकीचा दखला देऊन आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत केंद्रीय अर्थ मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला याबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, आजपर्यंत अर्थसंकल्पाला विरोध करणारे आता अर्थसंकल्पाच्या बाजूने बोलू लागलेत. हा बदल लक्षवेधी आहे. मुंबईतील जनतेने पारदर्शी कारभाराचा अजेंडा आता स्वीकारला असून त्याला घाबरलेल्यांनी आता चुकीचे संदर्भ वापरून आपली पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांचे हे स्वतःचीच पाठ खाजवणे म्हणजेच त्यांच्या बालबुद्धीचे लक्षण आहे. मंत्रापेक्षा थुंकी जास्त असाच हा प्रकार आहे असे म्हणावे लागेल. अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी फटकारले आहे.   ज्या आर्थिक  पाहणी अहवालाचा ते दाखला देत आहेत तो पूर्ण न वाचता महापालिकेतील शिवसेना नेते आरडाओरड करत आहेत. या आर्थिक पाहणी अहवालाच्या सुरूवातीलाच अहवालासाठी मागवण्यात आलेली माहिती ही तोकडी व अपूर्ण आहे असे म्हटलेले आहे. त्यामुळे अशा अर्धवट माहितीवर काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा चुकीचा अर्थ लावून  ही पोपटपंची करत आहेत. या अहवालामध्ये केवळ चार निकषांचा विचार करण्यात आला आहे. नळपाणी पुरवठा, मलनिसःरण वाहिनी, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाण्याचा निचरा या चारच मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे तर कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था,  पाणी, आरोग्य अशा अनेक मुद्यांचा या अहवालात विचार करण्यात आलेला नाही. मग आता आम्ही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थीत करतो आहोत. ज्या पारदर्शी कारभाराबाबत  हे बोलत आहेत त्यांनी नालेसफाईच्या कामातील खाजगी डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात आलेला गाळ कुठे आहे हे दाखवावे. एकच गाडी एकाच वेळी चार ठिकाणी फेऱ्या मारत होती हे कसे घडले याचे स्पष्टीकरण द्यावे. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांचा वरचा थर खरडवून काढला का? आणि त्याचे डेब्रीज कुठे टाकले? याचे उत्तरही त्यांनी द्यावे.   सत्तर हजार करोड च्या घोटाळ्याचे हिशेब द्या! यापुढे जाऊन आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुन्हा एक गंभीर आरोप सेनेवर केला आहे. सन २००७ ते २०१२ या कालखंडातील २००७ -०८ मधील १२८७७.५२ कोटी, २००८-०९ मधील १६८३१.०९ कोटी, २००९-१० मधील १९७७३.६० कोटी, २०१०-११ मधील २०४१७.३१ कोटी  एकूण   रू. ६९८९९.५२ कोटी यांचा  म्हणजेच सुमारे ७०,००० कोटी रूपयांचा ताळेबंद मांडण्यात आलेला नाही. कुठल्या कंत्राटदाराला बिले देण्यात आली. कोणती कामे करण्यात आली. कुठल्या वांद्रे पूर्व च्या बँकेत पैसे जमा करण्यात आले. या सगळ्याच्या एंन्ट्री झालेल्या नाहीत. या सगळ्याचे उत्तर शिवसेना नेतृत्व आणि विद्यमान स्थायी समितीच्या अध्यक्षांनी द्यावे.  अशी मागणी मी आज करतो आणि यापूर्वीही ती केली होती. असा घणाघाती आरोप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज नव्याने केला आहे. ज्या अहवालाचा उल्लेख करून शिवसेना पाठ थोपटून घेत आहे. त्या अहवालामध्ये जगामध्ये मुंबई महानगरपालिका ५० व्या क्रमांकावर गेली. हे का घडले? याचेही उत्तर द्यावे लागेल. असेही ते...

Read More

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थीतीत केला प्रवेश मुंबई, दि. ३१ जानेवारी सिटीझन फोरमसाठी काम करणारे ऍक्टिविस्ट म्हणून परिचित असलेले ख्यातनाम वकील आणि विद्यमान नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि भामला फाऊंडेशन चे अध्यक्ष असीफ भामला, युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य स्वप्नील चंद्रकांत येरूणकर, राष्ट्रवादीचे प्रशांत रेळे यांनी आज मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी पारदर्शी कारभाराचा अजेंडा मांडलेला असून त्याला आता मुंबई शहरात सिटीझन फोरम ने देखील पाठींबा दिला आहे. मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभाराची गरज असून हा अजेंडा घेऊन काम करणारे भाजपा पक्षाला पाठिंबा दिल्यास जनतेचे हित आहे म्हणूनच मी आणि आमची चळवळ भाजप च्या विचारधारेशी जोडले जात आहोत असे सांगत  सिटिझन कार्पोरेटर म्हणून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच प्रोग्रेसिव्ह नॅशनल पार्टी म्हणून आम्ही भाजपाकडे पाहात असून आमच्या विचारधारेला त्यांनी आपल्या विचारधारेशी जोडून घेतले. आम्ही नागरिकांच्या माध्यमातून  उभ्या केलेल्या या चळवळीला भाजप ने ही पाठींबा दिला याचे आम्हाला आनंद होत आहे असे  सांगत नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिकेत उत्कृष्ट काम करणारे नगरसेवक, अभ्यासू वकील आणि जगभरात वकीलीचा व्यवसाय करणारे नार्वेकर हे ऍक्टिविस्ट म्हणूनही ज्ञात आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या सहकारी  श्रीमती हर्षदा नार्वेकर यांनी ही भाजपा मध्ये प्रवेश केला. त्या हेल्थ केअर कन्सल्टंट असून विविध सामाजिक चळवळींशी जोडलेल्या आहेत. या दोन्ही उच्चविद्या विभूषित व्यक्तींचे स्वागत करताना मला आनंद होत आहे असे मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. कुलाब्याचे आमदार राज पुरोहीत यांच्या प्रयत्नाने  या दोघांचा पक्ष प्रवेश होत आहे असेही आमदार आशिष शेलार यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आय लव बांद्रा आणि भामला फाऊंडेशन या माध्यमातून आरोग्य आणि शहरातल्या विविध विषयांवर काम करणारे आसिफ भामला यांनीही पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षात विद्यार्थी चळवळीपासून मी काम करत असून जिल्हाध्यक्ष पदावर सध्या कार्यरत होतो. या सगळ्याबाबत वरिष्ठांशी बोलूनही याची दखल घेतली नाही आणि काम करण्याची स्वातंत्र्य पक्षात उरले नाही म्हणून मी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करत आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी भाजप चांगले काम करत असून शिक्षण, रोजगार आणि या समाजाला एकूणच न्याय देण्याची भूमिका या देशातील आणि राज्यातील सरकारने घेतली आहे त्यामुळे या पक्षात प्रवेश करण्याचा मी निर्णय घेतला. पारदर्शी कारभार हा भाजपाचा अजेंडा असून  अल्पसंख्यांक समाजाला भाजपा न्याय देऊ शकेल, मी माझ्या अल्पसंख्यांक समाजातील बांधवांनाही आवाहन करतो की या पक्षाशी जोडले जा, असे सांगत आसिफ भामला यांनी पक्षप्रवेश केला. विद्यार्थी सेनेत आणि युवासेनेत महाराष्ट्राच्या कोअर कमिटीत काम करणारे आणि कुर्ला विभागात काम करणारे स्वप्निल चंद्रकांत येरूणकर तसेच सेना नगरसेविका लिना शुक्ला यांच्यासाठी काम करणाऱे प्रशांत रेळे यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश करण्यात आले तर यावेळी आमदार राज पुरोहीत, आमदार मनिषा चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आदी उपस्थित...

Read More