मुंबईकरांचा जाहिरनामा/ Manifesto

Click to View

Read More

हिवाळी अधिवेशन अहवाल २०१६

Read More

पावसाळी अधिवेशन 2016 कार्यअहवाल

Read More

अर्थसंकल्प अधिवेशन अहवाल 2016

Read More

Adv. Ashish Shelar 2015 Nagpur Session Report

Read More

गणेशोत्सव महासंघाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील – वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार

गणेशोत्सव महासंघाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील – वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार गणेशोत्सव महासंघाचे महाराष्ट्रासह परदेशातीलही पदाधिकाऱ्यांची घोषणा गणोशोत्सव मंडळांमध्ये खरा समन्वय महासंघच साधतो आहे – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार विकास मंडळ, साई विहार, भांडूप या गणेशोत्सव मंडळास यावर्षींचा एक लाखाचे प्रथम पारितोषिक मुंबई दि. 7 ऑक्टोंबर, भरगच्च भरलेले सभागृह, कार्यकर्त्यांचा शिगेला पोहोचलेला उत्साह गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि सोबत बक्षीसे जाहीर होताच ढोल ताशांचा गजर अशा प्रचंड उत्साहात मंगळवारी माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरामध्ये महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाच्या पहिल्या वर्षीच्या गणेश गौरव पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या महासंघाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील असा विश्वास या कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे आणि राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई महाराष्ट्रासह अमोरिका आणि परदेशात अन्य ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांशी समन्वय व्हावा म्हणून तेथीलही पदाधिकाऱ्यांची कार्यकारीणी यावेळी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ स्थापन करून मुंबईसह महाराष्ट्रातील शेकडो गणेशोत्सव मंडळांची मोट बांधून त्यामध्ये समन्वय साधण्याचे काम या महासंघाचे पदाधिकारी करत आहेत. या महासंघाची कार्यकारीणीही या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी जयेंद्र साळगावकर कार्यध्यक्ष संजय यादवराव, उपाध्यक्ष अशोकराव गोडसे, आणि मुक्ता टिळक प्रमुख कार्यवाहक म्हणून सुरेश सरनोबत तर सचिव पदी डॉ. विवेक भिडे प्रकाश दरेकर, प्रसाद महाडकर, किरण खानोलकर आणि खिसन चोपडे तर संजय गुमासे यांचे नाव खजीनदार म्हणून जाहीर करण्यात आले. विदर्भातील गणेशोत्सव मंडळाचे समन्वयक म्हणून हरीश मिश्रा तर अमेरिका येथे गेली अनेक वर्ष सार्वजनिक गणेशउत्सव साजरा करणारे ललित म्हाडेश्वर यांची अमेरिका तसेच न्यूझीलंड -ऑस्ट्रेलियाचे खासदार महेश बिंद्रा यांची ऑस्ट्रेलियाचे प्रमूख म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यावर्षी महासंघातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 105 हून अधिक मंडळे यामध्ये सहभागी झाली होती. मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम सांगणारा देखावा सादर करणाऱ्या विकास मंडळ, साई विहार, भांडूप या गणेशोत्सव मंडळास सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याचे लोकमान्य टिळकांच्या आवाजात प्रबोधन करणाऱ्या हनुमान सेवा मंडळ, धारावी गणेशोत्सव मंडळास द्वितीय क्रमांकाने तसेच बर्वे नगर, भटवाडी गणेशोत्सव मंडळास तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. यातून विषयनिहाय सहा वेगवेगळ्या विषयांना पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट मूर्तीकार – श्री. सुरेश कदम 1ली खत्तरगल्ली गणेशोत्सव मंडळ, गिरगाव, सर्वोत्कृष्ट सजावट – परमानंद वाडी बाल मित्र मंडळ, गिरगांव, सर्वोत्कृष्ट सामाजिक काम – सार्वजनिक गणेशोत्सव समिती, कन्नमवार नगर1, सर्वोत्कृष्ट इकोफ्रेंडली मूर्ती – बाळगोपाळ मित्र मंडळ, पारले, सर्वोत्कृष्ट गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक – चिंचपोकळी सार्वजनिक गणेश मंडळ, सर्वोत्कृष्ट धार्मिक कार्य – जी.एस.बी. सेवा मंडळ, वडाळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात महासंघाने पहिल्याच वर्षी ज्या पद्धतीने या गणेशोत्सव सणाला आणि चळवळीला समन्वयाची जोड दिली आहे त्याचे मनापासून कौतुक केले. पुढच्यावर्षीच्या बैठकीचे आमंत्रणही त्यांनी देत महासंघाच्या पाठीशी आपण खंबीर पणे उभे राहू अशी ग्वाही दिली. तर या महासंघाच्या पाठीशी उभे राहून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना अनेक महत्वाच्या विषयांत दिलासा देणाऱ्या मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा यावेळी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी समन्वय महासंघाच्या कामाचे कौतुक केले. काही समन्वय समित्या समन्वयाचे काम सोडून इतरच राजकीय कामे करीत आहेत असा जोरदार टोलाही लगावला. गणेशोत्सव मंडळांची बाजू अजून न्यायालयात मांडणे बाकी आहे. या उत्सवाचे स्वरूप आणि कार्य अधिक समाजाभिमूख व्हावे आणि उत्सवातील अडचणी कमी व्हाव्यात म्हणून न्यायालयात जाऊन गणेशोत्सव मंडळांची बाजू प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे हे काम महासंघाने करावे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त...

Read More